સનાતન સ્તોત્ર સંગ્રહ
Hanuman
સનાતન દેવ

..  મારુતીસ્તોત્રમ્ મરાઠી ..

॥  मारुतीस्तोत्रम् मराठी ॥
રચયિતા: પારંપરિક વાચન સંખ્યા: 1
23px

॥  मारुतीस्तोत्रम् मराठी ॥

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती । वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना  ॥ १ ॥

महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें । सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका ॥  २॥

दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा । पाताळदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ॥३॥

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ॥४॥

ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोटला पुढें । काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ॥५॥

ब्रह्मांडे माईलें नेणों, आवळे दंतपंगती । नेत्राग्नीं चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥६॥

पुच्छ ते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरीं । सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ॥७॥

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ॥८॥

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे । मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ॥९॥

आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती । मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ॥१०॥

अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठे, मेरू मंदार धाकुटे ॥११॥

ब्रह्मांडाभोवतें वेढें, वज्रपुच्छें करू शकें । तयासी तुळणा कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ॥१२॥

आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढें, भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥

धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही । पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ॥१४॥

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही । नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ॥१५॥

हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी । दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळागुणें ॥१६॥

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू । रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ॥१७॥

॥ इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।

પાઠ જપ: 0/108